
मैत्री ... ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. अमर, अकबर आणि अँथनी यांच्या मैत्रीची ही गोष्ट आहे. मनोरंजन आणि मस्तीचे जबरदस्त पॅकेज असलेल्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे. बेळगावकर असलेल्या निर्माते अमोद मुचंडीकर,वाणी हालप्पनवर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत. येत्या २७ जूनला ‘ऑल इज वेल’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.