

SHEFALI SHAH
ESAKAL
हिंदी मनोरंजन क्षेत्रात नेहमीच दमदार आणि वास्तववादी भूमिकांमुळे ओळख मिळवणाऱ्या अभिनेत्री शेफाली शाह यांनी छोट्या पडद्याच्या जगावर थेट आणि तिखट टीका केली आहे. भूमिकांमधील बारकावे आणि संवेदनशील अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीने सध्याच्या मालिकांच्या बदलत्या स्वरूपावर बोट ठेवत, ‘‘आज टीव्ही मालिकांची कथाच हरवली आहे’’, असे थेट भाष्य केले.