काही तासांपूर्वी शेअर केली रील, मेसेजला रिप्लायही दिला; राहत्या घरी मिळाला प्रसिद्ध रीलस्टारचा मृतदेह

ARUN TUPE DEATH REASON : लोकप्रिय मराठी रील स्टार अरुण तुपे याचं आज मंगळवार दिनांक १० मार्च रोजी निधन झाली. त्याच्या निधनाने सगळेच हादरलेत.
arun tupe

arun tupe

esakal

Updated on

महिन्याभरापूर्वी मराठमोळा इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम याचं निधन झालं होतं. त्याने वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. जानेवारी महिन्यात या चांगल्या कंटेन्ट क्रिएटरला गमावल्यानंतर आता मराठी चाहत्यांना आणखी एका इन्फ्लुएन्सरच्या मृत्यूने धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील बालाजी नगर येथे राहणाऱ्या लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपे याचं आज मंगळवारी १० मार्च रोजी निधन झालं. तो त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला, त्यामुळे चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com