

john abraham
esakal
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याने एक काळ गाजवलाय. त्याच्या पिळदार देहयष्टीवर आणि दिसण्यावर अनेक चाहते फिदा आहेत. त्याचे अनेक चित्रपट प्रेक्षकांचे आवडते आहे. मात्र आता जॉनचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात तो चाहत्यांसोबत फोटो काढताना दिसतोय. त्यात जॉन क्लीन शेव्ह दिसतोय. दाढी मिशी काढलेला जॉन या फोटोंमध्ये दिसतोय. यात तो म्हातारा दिसतोय. हा व्हिडिओ पाहून चाहते आश्चर्य चकीत झालेत. त्यावर नेटकरी निरनिराळ्या कमेंट करत आहेत. यासोबत त्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय.