
छत्रपती संभाजीनगर : अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा फिल्ममेकर्सचा होता. एक चित्रपट बनवणे हे खरोखरच आव्हानात्मक कामगिरी आहे. पण इच्छा आहे तर मार्ग आहेत. तरीही नैराश्य आल्यावर तुम्हाला सिनेमा बनवणे सोडून द्यावेसे वाटले तेव्हा ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील संवाद आठवा आणि म्हणा ‘जब तक सबकुछ ठीक नही होता, तब तक पिक्चर बाकी है मेरे दोस्त’ या शब्दांमध्ये दिग्दर्शक फराह खान यांनी फिल्ममेकर्सला प्रोत्साहित केले.