
लोकप्रिय दिग्दर्शिका फराह खान हीचा स्वयंपाकी दिलीप याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आता तो एक सेलिब्रिटी बनला आहे. चित्रपट आणि टीव्ही स्टार्सपासून ते सामान्य लोकांपर्यंत, प्रत्येकजण दिलीपचा चाहता आहे. दिलीपने फराह खानसोबत व्लॉगमध्ये केलेली मजा आणि विनोदी बोलणं सगळ्यांचं खूप आवडतं. फराह एका व्लॉगमध्ये म्हणालेली की दिलीपचा गावात तीन मजली बंगला आहे. दिलीप हा बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी आहे. नुकताच तो गावाला गेला होता. तेव्हा त्याने त्याचा गावातला बंगला दाखवला.