

Fatherland Movie Review: 57th International Film Festival of India
esakal
जयदीप पाठकजी
पणजीत सुरू झालेल्या ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात गुरुवारी पोलंड, जर्मनी, इटली आणि फ्रान्स यांची संयुक्त निर्मिती असलेल्या फादरलँड या सिनेमाने झाली. विख्यात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले दिग्दर्शक पावेल पावलिकोव्स्की यांची दिग्दर्शक म्हणून उत्तम कामगिरी आपण यापूर्वी इडा, कोल्डवॉर यांसारख्या चित्रपटातून पाहिली आहे. इथे दुसऱ्या महायुद्धानंतरची एक कथा अतिशय संवेदनशीलतेने मांडली जाते. नाझी राजवटीमुळे अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या बाप-लेकीचा जर्मनीत परतण्याचा प्रवास आणि त्यातून निर्माण होणारा वैचारिक संघर्ष हा चित्रपटाचा आशय.