
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'ठरलं तर मग' मध्ये नवीन ट्वीस्ट येणार आहे. कोर्टाने वात्सल्य आश्रमाच्या केसमध्ये अर्जुनला फक्त ३० दिवस दिलेत. त्यामुळे तो पुरावे मिळवण्यासाठी धडपडतोय. त्यात त्याच्या हातात साक्षीच्या विरोधात मोठा पुरावा लागलाय. ज्यावरुन असं सिद्ध होऊ शकतं की, ज्या रात्री विलासचा खून झाला त्या रात्री साक्षी आश्रम परिसरातच होती. अर्जुन हा पुरावा कोर्टात सादर करणार आहे. त्यामुळे साक्षी पुरती फसणार आहे.