
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी याची गाजलेली सीरिज 'द फॅमिली मॅन' च्या तिसऱ्या सीझनची चाहते कधीपासून मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते. एक सर्वसाधारण व्यक्ती जो दिवसभर आपल्या कामात व्यग्र असतो. आपल्या दोन मुलांची आणि पत्नीची जबाबदारी खांद्यावर घेऊन शांतपणे आपलं आयुष्य जगतोय. पण पुढे माहीत पडतं की हा सर्वसाधारण दिसणारा व्यक्ती एक ऑफिसर आहे. जो थेट दहशतवाद्यांसोबत लढून आपल्या कुटुंबाचंच नाही तर आपल्या देशाचंदेखील रक्षण करतोय. आता तोच 'फॅमिली मॅन' परत येतोय.