
seeta aur geeta hema malini
sakal
काही सिनेमाच्या निर्मितीच्या कथा फार मनोरंजक असतात. एखादा कलाकार काही कारणाने एखादी भूमिका नाकारतो. ती भूमिका ज्याच्याकडे जाते, तो कलावंत त्या भूमिकेचं सोनं करतो. नाकारलेल्या कलाकाराला कायम चुटपूट लागून जाते. रमेश सिप्पी ज्यांना आपण मेगा मूव्ही ‘शोले’चे दिग्दर्शक म्हणून ओळखतो त्यांचा त्याच्या आधीचा सिनेमा होता ‘सीता और गीता.’ या सिनेमाची प्रेरणा मार्क ट्वेन यांच्या ‘द प्रिन्स अॅण्ड द पॉपर’ या कथानकावर होती. याच कथानकावरून या आधी दिलीपकुमार यांचा ‘राम और शाम’ हा सिनेमा बनला होता. तो सुपरहिट ठरला. याच कथानकावरूनही नायिकेला केंद्रस्थानी ठेवून त्यांना सिनेमा बनवायचा होता.