
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी यांच्या आगामी 'रामायण' या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा असते. प्रेक्षक 'रामायण' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यात साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे तर रणबीर रामाच्या भूमिकेत आहे. दाक्षिणात्य अभिनेता यश चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवी पहिली पसंती नव्हती. एका दुसऱ्याच अभिनेत्रीला ही भूमिका ऑफर झालेली. मात्र तिने एका वेगळ्याच कारणामुळे नकार दिला. आता तिने स्वतः याबद्दल सांगितलं आहे.