
Entertainment News : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील बहुप्रतीक्षित मालिका ‘आमी डाकिनी’ प्रेक्षकांची उत्कंठा वाढवण्यासाठी एक वेधक कथानक घेऊन येत आहे. आहट सारख्या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेनंतर आता ही वाहिनी कोलकाताच्या सुंदर पार्श्वभूमीवरील ही मालिका सादर करत आहे. या मालिकेत हितेश भारद्वाज अयानच्या भूमिकेत, शीन दास डाकिनीच्या भूमिकेत तर राची शर्मा मीराच्या भूमिकेत दिसणार आहे.