
आपल्या आयुष्यात विविध टप्प्यांवर आपल्याला वेगवेगळ्या व्यक्ती भेटतात, पण त्यापैकी काही जण आपल्या मनाचा कोपरा जिंकून घेतात. मैत्रीची ही जादू कधी होते, कशी होते याचा अंदाजही येत नाही. दोन वेगवेगळ्या स्वभावांच्या व्यक्तींमध्ये निखळ मैत्री कशी निर्माण होते, हे अभिनेत्री दिव्या पुगावकर आणि स्नेहलता माघाडे यांच्या नात्यातून पाहायला मिळते. मालिकेतील ऑनस्क्रीन वैर असलेल्या या अभिनेत्रींची ऑफस्क्रीन मैत्री मात्र साऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.