
Fussclass Dabhade Movie: २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. हा या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी चौथा मराठी चित्रपट आहे. आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. बॉक्स ऑफिसवरदेखील या चित्रपटाने चांगली कमाई केलीये. पहिल्या तीन दिवसातच चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलंय असं म्हणायला हरकत नाही. पाहूया या चित्रपटाने तीन दिवसात किती कमाई केलीये.