
‘पैसे कमावण्यासाठी गाव सोडून शहरातच जावं लागतं… हे अगदी चुकीचं आहे!’ हा महत्त्वाचा विचार समाजापुढे मांडणारा ‘गाव बोलावतो’ हा चित्रपट ७ मार्च रोजी प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचे टिजर आज रिलीज करण्यात आले. भूषण प्रधान, गौरी नलावडे, माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट शेतकरी राजा आणि त्याची पुढची पिढी गाव-खेड्यांकडे कोणत्या दृष्टीने बघते यावर भाष्य करणारा हा चित्रपट असेल.