.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
काही दिवसातच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. बाप्पााच्या आगमनाची सगळ्यांनाच उत्सुकता असून बाप्पााच्या आगमनाची जय्यत तयारी सगळीकडे सुरु आहे. बाप्पा घरी येणार ही कल्पनाच खरतर सुखावणारी आहे. बाप्पााच्या सेवेत दिवस कसे निघून जातात हे देखील कळत नाही. मनोरंजन विश्वातही बाप्पााच्या आगमनाचा उत्साह असतो. विविध वाहिन्यांवरील मालिकांमध्येही गणपती बाप्पा विराजमान असतात. त्यामुळे मालिकांच्या सेटवरही बाप्पाचं जल्लोषात स्वागत होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळेल.