
'देऊळ बंद' या चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. २०१५ साली आलेल्या या चित्रपटात स्वामी समर्थ आणि एक नासामधला सायंटिस्ट राघव अशी टक्कर पाहायला मिळाली होती. विज्ञान हे अध्यात्मावर कसं अवलंबून आहे हे स्वामी त्याला समजून सांगतात. देवाला आव्हान देणाऱ्या राघवला नंतर कसा साक्षात्कार होतो हे या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. प्रवीण तरडेंनी लिहिलेल्या या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत होता. आता 'देऊळ बंद २' ची घोषणा करण्यात आली. मात्र या चित्रपटात गश्मीर नाहीये. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्यामागचं कारण सांगितलंय.