
महाराष्ट्र सरकार अभिनेता शाहरुख खानची सुमारे ९ कोटी रुपये परत करण्याची याचिका मंजूर करू शकते. ज्यामध्ये असा दावा करण्यात आलाय की ज्यावर शाहरुखचं घर 'मन्नत' बांधलं आहे, त्या जमिनीसाठी मुंबई उपनगरीय जिल्ह्याच्या (MSD) जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त पैसे देण्यात आले होते. वांद्रे पश्चिमेकडील बँडस्टँड येथे शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या नावावर नोंदणीकृत असलेला हा बंगला राज्य सरकारने मूळ मालकाला भाड्याने दिलेल्या जमिनीवर बांधला आहे. नंतर, सरकारने कराराला मान्यता दिली, त्यानंतर मालकाने ती मालमत्ता शाहरुख खानला विकली.