
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचं नाव क्रिकेटपटूंसोबत जोडलं गेलं. त्यातील काही जोड्या लग्नबंधनातदेखील अडकल्या. त्यातील एक जोडी म्हणजे हरभजन सिंग आणि गीता बसरा. गीता बसरा ही बॉलिवूड अभिनेत्री होती. मात्र काही वर्षांनी ती बॉलिवूडमधून गायब झाली. गीताचं नाव हरभजनशी जोडलं गेलं आणि गीताने चित्रपट गमावले. गेले अनेक वर्ष गीता बॉलिवूडपासून दूर आहे. पण सध्या ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीपासून अंतर ठेवण्यामागील खरं कारण सांगितलं.