
लोकप्रिय अभिनेता रितेश देशमूख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांची जोडी प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच सोबतच त्यांच्या वागण्यामुळे ते सगळ्यांचे आदर्श बनलेत. त्यांच्या चारचौघातील वागण्याचं कायमच कौतुक होतं. तसंच त्यांच्या मुलांच्या संस्कारांचं देखील कायमच कौतुक होत आलंय. महाराष्ट्राचे दादा वहिनी म्हणून ओळखले जाणारे रितेश आणि जिनिलिया आजही एकमेकांच्या तितकेच प्रेमात असल्याचं दिसतं. जिनिलियादेखील मराठी संस्कृती कायम जपताना दिसते. आताही तिने रितेशसाठी वटपौर्णिमेचं व्रत केलंय.