
छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीच्या असतात. त्यातील पात्र, त्यातील कथा सगळंच प्रेक्षकांच्या आवडीचं असतं. त्यातही सध्या स्टार प्रवाहावरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. मात्र या मालिकांमध्ये काही चुकीचं दाखवलं तर प्रेक्षक त्यावर राग व्यक्त करतात. तसेच काही चांगला प्लॉट ट्विस्ट दाखवला तर प्रेक्षक लेखकाचं कौतुकही करतात. असंच कौतुक सध्या 'घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या लेखकाचं होतंय. कारण या मालिकेत आलेला नवा ट्विस्ट प्रेक्षकांना भलताच पसंत पडलाय.