

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या असतात. या मालिका म्हणजे दिवसभरातून करमणुकीचं साधन असतं. त्यात 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. मालिकेतील जानकी आणि ऋषिकेशची जोडीही प्रेक्षकांची आवडती आहे. जानकी आपल्या घरासाठी, घर टिकवण्यासाठी करणारे प्रयत्न प्रेक्षकांना आवडतायत. आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. ऐश्वर्या पुन्हा एकदा आपला खरा रंग दाखवणार आहे. कोर्टात ती स्वतःच्याच वडिलांविरोधात साक्ष देणार आहे. हे पाहून प्रेक्षकांच्या रागाचा भडका उडाला आहे.