
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'घरोघरी मातीच्या चुली' प्रेक्षकांची आवडती आहे, मात्र आता मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या कथानकाने प्रेक्षक चांगलेच चिडले आहेत. या मालिकेचं कथानक सुरुवातीला खूप छान होतं. मालिकेत एक हसतं खेळतं घर दाखवण्यात आलं होतं. भावाभावांचं प्रेम दाखवण्यात आलं होतं. मात्र सध्या मालिकेत नुसते डावपेच दाखवण्यात येत आहेत. आता प्रेक्षकही हे सगळं पाहून वैतागले आहेत. मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होतोय.