
छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांना कायम आपल्याशा वाटतात. या मलिका काही अंशी समाजाचा आरसाच आहे असं म्हटलं जातं. काही मालिका प्रेक्षक डोक्यावर घेतात. मात्र मालिकेत जर चुकीचं दाखवण्यात येत असेल तर प्रेक्षक मालिकेच्या लेखकांचे आणि निर्मात्यांचे कान पकडतात. आता स्टार प्रवाहावरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेलादेखील प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागतोय. त्याचं कारण म्हणजे मालिकेचं कथानक.