
ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या गाजलेल्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाने नुकतीच ५२ वर्षं पूर्ण केली आहेत. १६ डिसेंबर १९७२ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. मराठी आणि भारतीय रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरलेलं हे नाटक आजपर्यंत दहा भारतीय भाषा आणि जगातील तीन भाषांमध्ये सादर झालं आहे. मात्र, व्यावसायिक दृष्ट्या ते कधीही हिंदीत सादर झालेलं नाही.