

girija oak
ESAKAL
कलाकार असले तरी त्यांच्यावरही घराची जबाबदारी असते. अनेक अभिनेत्री घर सांभाळून आपलं करिअर सांभाळताना दिसतात. छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील अनेक अभिनेत्री आपल्या मुलांना त्यांच्या शूटिंगच्या ठिकाणी घेऊन जातात. मात्र आपल्या पाल्याच्या शाळेतल्या डब्ब्यापासून कपड्यांपर्यंत सगळी काळजी त्या घेताना दिसतात. काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेली लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओकदेखील एका मुलाची आई आहे. त्याचं नाव कबीर आहे. गिरीजाचा मुलगा आता १२ वर्षाचा आहे. तो शाळेत जातो. मात्र त्याला इतरांसारखा दररोज डब्बा द्यावा लागत नाही. त्यामागचं कारण गिरिजाने एका मुलाखतीत सांगितलंय.