

govinda
ESAKAL
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता याने एक काळ गाजवलाय. तो गेले काही वर्ष त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याच्यामध्ये आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्यात वाद असल्याचं बोललं जातंय. गेले कित्येक महिने सुनीता या माध्यमांसमोर येऊन आपल्या पाटीवर आरोप लावताना दिसतात. गोविंदाचं बाहेर अफेअर सुरू आहे, वयाच्या ६३ असं वागणं त्याला शोभत नाही असं त्या म्हणाल्या. नुकत्याच एका मुलाखतीत सुनीता आहुजाने २०२५ हे वर्ष अत्यंत वाईट गेल्याचं सांगितल्यानंतर आता अखेर गोविंदाने या सगळ्या चर्चांवर मौन सोडलं आहे.