
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी गेले कित्येक महिने सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ९०च्या दशकात गोविंदाने आपल्या अभिनयाच्या आणि नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. गोविंदा सध्या सिनेसृष्टीपासून दूर असतो. गेले कित्येक वर्ष त्याचा कोणताही चित्रपट आलेला नाही. मात्र त्याची वक्तव्य कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. एका मुलाखतीत त्याने आपल्याला 'अवतार' हा हॉलिवूड चित्रपट ऑफर झाल्याचं सांगितलं होतं. त्यावरून तो ट्रोलही झाला होता. आता याविषयी त्याची पत्नी सुनीता अहुजा हिने वक्तव्य केलं आहे.