
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा लोकप्रिय अभिनेता गोविंदा याने प्रचंड लोकप्रियता पाहिली. त्याच्या हसण्याची स्टाइल, बोलण्याची स्टाइल, नाचण्याची हटके पद्धत या सगळ्यामुळे तो कित्येकांचा आवडता होता. ८०-९० च्या दशकात तर तो टॉपचा अभिनेता होता. त्याचे एकापाठोपाठ एक चित्रपट हिट होत होते. मात्र त्याचीच हवा त्याच्या डोक्यात गेली आणि तो सेटवर नखरे दाखवू लागला. अनेक दिग्दर्शकांनी त्याचे वाईट अनुभव सांगितले आहेत. इतकंच नाही तर त्याच्या पत्नीने देखील त्याच्या या वागण्याबद्दल स्पष्ट भाष्य केलं होतं. आता प्रसिद्ध पत्रकार आणि लेखिका अनिता पाध्ये यांनी त्यांना गोविंदाचा आलेला अणुइभव सांगितलाय.