
आपल्या अभिनयाने आणि डान्सने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या गोविंदाने ९०चा काळ गाजवला. त्याच्या दिसण्यावर लाखो तरुणी फिदा होत्या. तो अनेकांच्या गळ्यातील ताईत होता. तो चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असायचा. गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या वैवाहिक आयुष्यात सारंकाही आलबेल नसल्याचं बोललं जातंय. अभिनेत्याची पत्नी सुनीता अनेक कार्यक्रमांना एकटीच दिसल्याने या चर्चांना उधाण आलं. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याचं बोललं जातंय. आता त्याच्या भाच्यानेच याबद्दल खरं सांगितलं आहे.