

rupa biswas aaj shanibar song in gta 6
esakal
GTA 6 या लोकप्रिय व्हिडिओ गेमची सध्या जगभरातील गेमर्समध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. गेममधील ग्राफिक्स, मिशन्स आणि फीचर्ससोबतच त्याच्या म्युझिकनेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे, या गेममध्ये एका जुन्या भारतीय गाण्याला स्थान देण्यात आलं आहे. तब्बल ४४ वर्षांपूर्वी रेकॉर्ड झालेलं हे गाणं आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्याने चर्चेत आलं आहे. या गाण्याचं नाव आहे ‘आज शनिबार’. बंगाली भाषेतील हे गाणं गायिका रूपा बिस्वास यांनी गायलं असून १९८२ मध्ये त्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलं होतं. आता GTA 6 मधील रेडिओ स्टेशनवर हे गाणं ऐकायला मिळत असल्याने जुन्या भारतीय संगीताची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.