
गेल्या १५ दिवसात २ उत्कृष्ट मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. एक म्हणजे 'आता थांबायचं नाय' आणि दुसरा 'गुलकंद'. या दोन्ही चित्रपटांचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं. मात्र या चित्रपटांसोबतच अजय देवगण आणि रितेश देशमुखचा 'रेड २' प्रदर्शित झाला आणि आता मराठी सिनेमे चालणार नाहीत असा अनेकांचा समज झाला. मात्र सगळ्यांचा हा समज लवकरच खोटा ठरला. कारण 'रेड २' च्या समोर हे दोन्ही मराठी चित्रपट अजूनही पाय रोवून उभे आहेत. अजूनही तुम्ही जर हे चित्रपट पहिले नसतील तर थिएटरमध्ये पाहायलाच हवेत असे हे चित्रपट आहेत. वाचा या चित्रपटांनी किती कमाई केलीये.