
भारतीय कुटुंब व्यवस्थेमध्ये नात्याला खूप महत्त्व आहे. आपली कुटुंब व्यवस्थाच आपली नाती कणखर आणि मजबूत बनविते. कितीही वादळं आली किंवा संकटं आली तरी नाती काही तुटत नाहीत. उलट त्या वादळांमधूनच वा संकटांमधूनच आपल्या नात्याची वीण अधिक घट्ट बांधली जाते. एकमेकांवरील विश्वास आणि प्रेम अधिक घट्ट होत जातो. दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि निर्माते संजय छाब्रिया यांचा आता प्रदर्शित झालेला 'गुलकंद' हा चित्रपट त्याच कणखर नात्यांची आणि गोडसर परंतु मुरलेल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा आहे.