

jhaad phunk movie review.
esakal
हॉरर चित्रपटांचा एक वेगळाच प्रेक्षक वर्ग असतो. भूत-प्रेत, भयावह दृश्ये आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनांसोबतच अंधश्रद्धा हादेखील अशा चित्रपटांचा महत्त्वाचा भाग असतो. दिग्दर्शक राजन रामगोपाल वर्मा यांचा ‘झाड फुंक’ हा चित्रपटही प्रेक्षकांना अशाच रहस्य आणि भयाच्या विश्वात घेऊन जाणारा आहे. एका गर्भवती महिलेच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या घटनांमुळे तिचे संपूर्ण जगच कसे बदलून जाते... प्रत्येक घटनेनंतर तिच्या मनात नव्या शंका कशा निर्माण होतात... स्वतःचा आणि आपल्या होणाऱ्या बाळाचा जीव वाचवणे हेच तिच्यासमोरचे सर्वांत मोठे आव्हान कसे बनते...या कथानका भोवती फिरणारा हा चित्रपट आहे.