

Hanuman Ansh movie based on Neem Karoli Baba's life
ESAKAL
गेल्या काही दिवसात बॉक्स ऑफिसवर एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली आहे. एका कोट्यवधी खर्चून बनवलेल्या चित्रपटाला काही कोटींच्या साध्या चित्रपटाने धोबीपछाड केलंय. तब्बल ५१ वर्षांपूर्वी असं घडलं होतं जेव्हा 'जय संतोषी माता' प्रदर्शित झालेला. या चित्रपटाने 'शोले' चित्रपटाला टक्कर देत १६५०% चा नफा कमावला होता. आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर तोच चमत्कार पाहायला मिळतोय. बाबा नीम करोली यांच्या आयुष्यावर आधारित 'हनुमान अंश' या चित्रपटाने 'टॉक्सिक' ला मागे टाकत कमाईत जोरदार उडी घेतलीये.