अक्षयासोबत लग्न झाल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला? हार्दिक जोशीने सांगितली सगळ्या नवऱ्यांची व्यथा

HARDEEK JOSHI TALKED ABOUT WIFE AKSHAYA DEODHAR: लोकप्रिय मराठी अभिनेता हार्दिक जोशी याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अक्षयामुळे त्याच्या आयुष्यात काय बदल झाला हे सांगितलंय.
HARDEEK JOSHI ON AKSHAYA DEODHAR

HARDEEK JOSHI ON AKSHAYA DEODHAR

ESAKAL

Updated on

'तुझ्यात जीव रंगला' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय जोडी म्हणजे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. या दोघांनी राणादा आणि पाठकबाई बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेतून हे दोन्ही कलाकार घराघरात पोहोचले. त्यांना पाहून या दोघांनी खऱ्या आयुष्यात एकत्र यावं अशी अनेक चाहत्यांची इच्छा होती. अखेर चाहत्यांची ही इच्छा पूर्ण झाली आणि अक्षया आणि हार्दिक यांनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचं आयुष्य बदलतं तसं पुरुषाचही आयुष्य बदलतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयाच्या येण्याने आपल्या आयुष्यात काय बदल झाले हे हार्दिकने सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com