
Akshaya Deodhar And Hardeek Joshi : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतायत. हार्दिक आणि अक्षया ही जोडी प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून ही जोडी घराघरात पोहोचली.
अक्षयाने पाठकबाई बनून सगळ्यांना भुरळ घातली तर हार्दिकने राणादा बनून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्या दोघांनी डिसेंबर २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या साखरपुड्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. आज २ डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण झालीये. त्यानिमित्ताने हार्दिकने लाडक्या पत्नीसाठी खास पोस्ट केलीये.