हॅरी पॉटरमधली हर्मायनी ग्रेंजर 'या' वयस्कर अभिनेत्याला डेट करतीये ? Lake Como मधील फोटोंमुळे चर्चेला उधाण; Viral Post

EMMA WATSON GEORGE CLOONEY DATING RUMOURS: ‘हॅरी पॉटर’ फेम एमा वॉटसन Lake Como येथे जॉर्ज क्लूनी यांच्या घरी दिसल्यानंतर दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे.
Emma Watson’s Surprise Lake Como Visit Sparks George Clooney Dating Buzz Hollywood News

Emma Watson’s Surprise Lake Como Visit Sparks George Clooney Dating Buzz Hollywood News

sakal

Updated on

HARRY POTTER STAR EMMA WATSON DATING NEWS: हॅरी पॉटरमध्ये आपल्या भेधडक भूमिकेने सगळ्यांच्याच मनात खास घर केलेली हर्मायनी ग्रेंजर म्हणजेच एमा वॉटसन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. इटलीतल्या प्रसिद्ध लेक कोमो Lake Como परिसरात ती एका प्रॉपर्टीमध्ये जाताना दिसली. मात्र, विशेष बाब म्हणजे ही प्रॉपर्टी अमेरिकन अभिनेता जॉर्ज क्लूनी आणि त्यांची पत्नी अमल क्लूनी यांची आहे. त्यामुळे एमा तिथे का गेली होती, याची माहिती समोर आलेली नसतानाच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. आणि त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झालीये, एमा वॉटसन क्लूनी यांच्या घरी का गेली होती?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com