

harshada khanvilkar
esakal
छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी आक्कासाहेब बनून स्वतःचा वेगळा दरारा निर्माण केला. सध्या त्या 'लक्ष्मी निवास मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतायत. मालिकेत सध्या लक्ष्मी आणि निवास यांचं घराचं स्वप्न सत्यात उतरलं आहे. त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत हर्षदा यांनी त्यांच्या घराची कहाणी सांगितली आहे. आपलं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र ती सत्यात उतरण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.आपलं मोठं घर होण्यामागे आईचा खूप मोठा वाटा आहे असं हर्षदा म्हणाल्या.