
'सनम तेरी कसम', 'हसीन दिलरुबा' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या हर्षवर्धन राणेने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. आता त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल नवीन निर्णय घेण्यात आलाय. हर्षवर्धन ‘दीवानियत’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता या चित्रपटाचे नाव बदलून ‘दीवाने की दीवानियत’ असे ठेवण्यात आले आहे.या चित्रपटात हर्षवर्धन राणे सोबत सोनम बाजवा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.