
टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या नव्या मालिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. तेजश्रीने 'होणार सून मी या घरची' मालिकेमधून प्रेक्षकांची मनं जिंकली होती.त्यानंतरही 'अग्गबाई सासूबाई', 'प्रेमाची गोष्ट' या मालिकांमध्ये दिसली. आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सज्ज झालीये. ती लवकरच स्टार प्रवाहवरील नव्या मालिकेत दिसणार आहे. आता या मालिकेचा दुसरा प्रोमो समोर आलाय. यात स्वानंदी आणि तिच्या आयुष्यातील चढउतार दिसतायत. तर या प्रोमोमध्ये इतर कलाकारही दिसत आहेत.