
Entertainment News: मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिस काही महिन्यांपूर्वीच परदेशातून परत आली. परत आल्यावर तिने प्रेक्षकांना दोन गुड न्यूज दिल्या. पहिली म्हणजे मृणाल पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात परतली आणि ती आता लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसतेय. तर दुसरी गुड न्यूज म्हणजे मृणालने तिच्या नवऱ्याच्या साथीने नवीन हॉटेल सुरू केलं आहे. अभिनेत्रीने तिचा पती नीरज मोरे याच्या साथीने ठाण्यात नवीन हॉटेल सुरू केलंय. आता मृणाल बिझनेसवूमन झालीये. पाहुयात तिचं हॉटेल आतून कसं आहे.