Sanjeeda Sheikh : घटस्फोटाच्या वक्तव्याबद्दल संजीदा वादाच्या भोवऱ्यात

‘‘काही पुरुष तुम्हाला डिमोटिव्हेट करण्याचा प्रयत्न करतात, ते तुम्हाला सांगतात की, तुम्ही काहीही करू शकत नाही.
Sanjeeda Sheikh
Sanjeeda Sheikh Sakal
Updated on

संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’मध्ये वहिदा जानची भूमिका करणारी संजीदा शेख अलीकडेच तिच्या पती आमिर अलीपासून घटस्फोटाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली. तिला घटस्फोट मिळाल्यामुळे स्वतः भाग्यवान असल्याची भावना व्यक्त केली, ज्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

अलीकडेच दिलेल्या मुलाखतीदरम्यान संजीदा शेख म्हणाली की, ‘‘काही पुरुष तुम्हाला डिमोटिव्हेट करण्याचा प्रयत्न करतात, ते तुम्हाला सांगतात की, तुम्ही काहीही करू शकत नाही. आयुष्यात अशा स्थितीत अशा लोकांपासून दूर राहणे चांगले.’’ ती पुढे म्हणाली, ‘‘त्यात सुरुवातीला अशी वेळ येते जेव्हा तुम्ही आनंदी असता आणि मग एक वेळ अशी येते की, तुम्ही आनंदी नसता.

अशा परिस्थितीत तुम्ही आयुष्यभराचा निर्णय घ्या आणि मीही तेच केले, कारण मी स्वतःवर प्रेम करू लागले. मी स्वतःला प्राधान्य दिले आहे आणि हे खरोखर महत्त्वाचे आहे. माझ्यासोबत जे काही घडलं, त्यामुळे कदाचित मी असा विश्वास ठेवू लागले की, मी सर्वांत दुःखी मुलगी आहे. माझ्यासोबत काय होतंय, माझ्या आयुष्यात काय घडतंय, असा प्रश्न मला पडायचा; पण मी माझ्या या डिसीजनसाठी आनंदी आहे.

मी स्वतःला भाग्यवान समजते.’’ आमिर अलीने यावर प्रतिक्रिया देत म्हणाला की, ‘‘मी किंवा ती जे काही बोलतो ते नेहमीच एकमेकांबद्दल नसते. आम्ही जवळपास पाच वर्षे एकत्र नाही आहोत. आमची गोष्ट खूप जुनी आहे जी आता संपली आहे. वेगळे होताना माझं काय झालं, हे फक्त मलाच माहिती आहे.’’

Sanjeeda Sheikh
Heeramandi : 'हिरामंडी'च्या भव्य यशानंतर आता येतोय सीझन २ ! खास अंदाजात केली घोषणा

आमीर अली पुढे म्हणाला, ‘‘लोकांसमोर कुणाबद्दल वाईट बोलणे हा माझा क्लास नाही. मी कधीही कोणाला निराश केले नाही आणि करणारही नाही. विशेषत: ज्या लोकांशी माझे संबंध आहेत.’’ आमिर अली आणि संजीदा शेख यांची भेट ‘क्या दिल में है’ या टीव्ही शोच्या सेटवर झाली होती. त्यांचे व्यावसायिक संबंध रोमँटिक बनले, त्यामुळे २०१२ मध्ये त्यांचा विवाह झाला. या जोडप्याला २०१८ मध्ये एक मुलगी झाली; परंतु २०२० मध्ये वेगळे झाले आणि २०२१ मध्ये घटस्फोट झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com