

KRANTIJYOTI VIDYALAYA BOX OFFICE
ESAKAL
२०२६ ची सुरुवात मराठी चित्रपटांसाठी अतिशय चांगली झालीये असं म्हणायला हरकत नाही. २०२६च्या सुरुवातीलाच म्हणजेच १ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलंय. या चित्रपटाने अवघ्या ६ दिवसात कोट्यवधींची कमाई केली आहे. अजूनही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. पहिल्या सहा दिवसातच या चित्रपटाने त्याच्या बजेटच्या दुप्पट कमाई केली आहे.