
'फसक्लास दाभाडे' हा या वर्षीचा म्हणजेच २०२५ मध्ये प्रदर्शित झालेला चौथा मराठी चित्रपट आहे. यापूर्वीच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यातही परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांच्या 'मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी' या चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. अशात आता हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' या आगळ्या वेगळ्या कौटुंबिक चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. आता हा चित्रपट त्या अपेक्षांवर खरा उतरलाय का ते पाहूया.