

mi savitribai jotirao phule shoot location
esakal
छोट्या पडद्यावर लावकारच काही नवीन मालिका सुरू होणार आहेत. त्यातील एक मालिका म्हणजे स्टार प्रवाहवरील 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले'. या मालिकेत क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यातील संघर्ष दाखवण्यात येणार आहे. तर मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि अभिनेते अमोल कोल्हे मुख्य भूमिकेत आहेत. मधुराणी आणि अमोल कोल्हे यांनी या मालिकेसाठी प्रचंड तयारी केलीये. अशातच नुकताच या मालिकेचा सेट रिव्हिल करण्यात आला. नुकत्याच सकाळ प्रिमिअरला दिलेल्या मुलाखतीत मधुराणीने या सेटवरील तिची आवडती जागा दाखवलीय.