Hina Khan: आधी हसली, मग रडली! कॅन्सरच्या लढ्यादरम्यान हिना खानने कापले केस; लेकीसाठी कळवळला आईचा जीव

Hina Khan Cut Her Hair: लोकप्रिय अभिनेत्री हिना खान हिने तिच्या केसांवर कैची चालवली आहे. ती कॅन्सरशी लढा देत आहे.
 hina khan
hina khan

Hina Khan Cancer Battle: अभिनेत्री हिना खान हिने काही दिवसांपूर्वीच आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाला असल्याचं सांगितलं. तिच्या या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. हिनाने तिच्या किमोथेरपीच्या आधीचा एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. आता तिने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आलं आहे. किमोथेरपीची तयारी करताना हिनाने तिच्या केसांवर कैची चालवली आहे. हिनाने केस कापले आहेत. सुरुवातीला ती हसताना दिसतेय पण नंतर तिच्याही डोळ्यात पाणी येतं. हा व्हिडिओ शेअर करत तिने एक मेसेजही शेअर केला आहे.

अभिनेत्रीला स्टेज ३चा कर्करोग झाला आहे. किमोथेरपीमुळे अनेकांचे केस गळतात. त्यामुळे हिना यागोष्टीसाठी आधीपासूनच स्वतःला तयार करतेय. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात सुरुवातीला हिना आरशासमोर बसली आहे तर तिची आई शेजारी तिला पाहतेय. आपल्या मुलीला पाहून तिलाही अश्रू अनावर झाले आहेत. हीनाची आई रडायला सुरुवात करते हे पाहून ती आईला रूममधून बाहेर जायला सांगते. तेव्हा आई मी तुझ्यासाठी प्रार्थना करते असं सांगते. त्यानंतर हिना स्वतःच्या हाताने केस कापताना दिसते. ती केसांचा पूर्णपणे बॉयकट करते आणि मला छान वाटतंय असं म्हणत हसते.

हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिलं, 'मला माहितीये की हे खूप अवघड आहे. कसं वाटेल तुम्हाला तुमचे सगळ्यात आवडते केस असे काढून टाकावे लागले तर? जर तुम्हाला जिंकायचं असेल तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. आणि मी जिंकणं निवडतेय.' हा व्हिडिओ पाहताना मात्र नेटकरी भावुक झाले आहेत. तिला अशा अवस्थेत पाहून नेटकरी तिला मजबूत राहायला सांगत आहेत. आमची प्रार्थना तुझ्यासोबत आहेत असं चाहते म्हणत आहेत.

 hina khan
Juhi Chawla: सासूबाईंनी ऐनवेळी कॅन्सल केलेलं जुही चावलाचं आलिशान लग्न; २ हजार पाहुण्यांना केलेला फोन, अभिनेत्री ठरलेली कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com