Hina Khan: अवॉर्ड शोनंतर किमोथेरपीसाठी थेट रुग्णालयात पोहोचली हिना खान; ब्रेस्ट कॅन्सरशी असा देतेय लढा

Hina Khan First Chemotherapy: अभिनेत्री हिना खान हिने ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची घोषणा केली आणि आता ती केमोथेरपी घेत आहे.
hina khan
hina khan sakal

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान हिने नुकतीच तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची घोषणा केली होती. तिला तिसऱ्या स्टेजवरील स्तनांचा कर्करोग झाल्याचं तिने सांगितलं. त्यानंतर तिचे चाहते चांगलेच धास्तावले. आपल्या आवडत्या अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का बसला. आता हिनाने आणखी एक पोस्ट केली आहे ज्यात ती अवॉर्ड शो मधून थेट रुग्णालयात जाताना दिसतेय. तिच्या पहिल्या केमोथेरेपीसाठी ती रुग्णालयात दाखल झाली आहे. तिची ही पोस्ट सध्या चाहत्यांमध्ये व्हायरल झाली आहे.

या पोस्टमध्ये हिना एका अवॉर्ड फंक्शनमध्ये फोटोशूट करत आहे. तर तिथून ती थेट हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली दिसत आहे. ही तिची पहिली किमोथेरपी आहे. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिलं, 'फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या सर्वांसाठी. हा तो दिवस होता ज्याने सर्व काही बदलून टाकले, माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक टप्प्यांपैकी एकाची सुरुवात झाली. मी स्वतःला पुन्हा शोधण्याची संधी म्हणून हे आव्हान घेण्याचे ठरवले आहे. मी सकारात्मक राहायचं ठरवलं आहे.'

पुढे तिने लिहिलं, 'मी हे माझ्यासाठी सरळ साधं ठेवण्याचं निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी माझ्या कामाची बांधिलकी महत्त्वाची आहे. माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी प्रेरणा, आवड आणि कला. मी कॅन्सरसमोर हार मानणार नाही. हा पुरस्कार, जो मला माझ्या पहिल्या केमोच्या अगदी आधी मिळाला होता, ही माझी एकमात्र प्रेरणा नव्हती. मी या कार्यक्रमात गेले आणि माझ्या पहिल्या केमोसाठी थेट रुग्णालयात पोहोचले. मी सर्वांना नम्रपणे विनंती करते की स्वतःसाठी ध्येय निश्चित करा आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ते कितीही अवघड असले तरी. कधीही मागे हटू नका. कधीही हार मानू नका.' हिनाच्या या पोस्टची सनेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

hina khan
कसे शूट झाले 'मिर्झापूर २'मधील विजय वर्मा आणि श्वेता त्रिपाठी यांचे इंटिमेट सीन? अभिनेता म्हणतो- जेव्हा तिने बेल्टने..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com