
सध्या रमजानचा महिना सुरू आहे. मुस्लीम समुदायासाठी रमजानचा महिना अत्यंत पवित्र समजला जातो. या महिन्यात सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत उपवास केला जातो. त्यालाच रोजा म्हणतात. फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे या महिन्यात रोजा ठेवतात. मात्र त्यातच एक हिंदू अभिनेतादेखील आपल्या पत्नीच्या सोबतीला रोजे ठेवतोय. एकमेकांच्या धर्माचा आदर करत ते दोघे दोन्ही धर्माचे सण मोठ्या उत्साहात साजरे करतात. आता त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या उपवासांबद्दल सांगितलं आहे.