
महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्ती मागे घेतल्याने ठाकरे बंधूंचा ५ जुलै रोजी विजयी मेळावा झाला. त्यात राज ठाकरेंनी आपण उद्धव ठाकरेंसोबत जाणार असल्याची घोषणा केली. त्यात काही दिवसापूर्वीच मनसे सैनिकांनी एका गुजराती व्यावसायिकाला मारहाण केलेली. त्यावरही विजयी मेळाव्यात राज यांनी भाष्य केलं. आता राज ठाकरेंचा समर्थक असलेल्या हिंदुस्तानी भाऊने त्यांच्या विरोधात पोस्ट केली आहे. या युतीमुळे तो दुखावला गेल्याचं दिसतंय.